32.76°C Pune
Thursday, May 9
image

भगवान महावीरांची चिंचवडमध्ये पालखीतून मिरवणूक

चिंचवड, ता. २२ : चिंचवड येथील सुदर्शननगरमधील श्री अरिहंत दिगंबर जैन ट्रस्टच्या वतीने १००८ श्री महावीर भगवान जन्मकल्याण महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. 


या कार्यक्रमाचे ट्रस्टचे अध्यक्ष नेमीचंद ठोले, कार्याध्यक्ष शीतल पहाडे, सतीश दोशी, शीतल शाह, कुमुद शास्त्री, डॉ राकेश जैन, विमल जैन, डॉ प्रकाश बडजात्या, अंजली शहा यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

दि.२१ एप्रिल रोजी स.७.३० ते ९.30 या वेळेत हि पालखी चिंचवड परिसरातून काढण्यात आली .आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित पालखी सोहळ्याची  सुरुवात सुदर्शन नगर येथील १००८ श्री मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरापासून झाली . दुर्गा कॉर्नर- लिंक रोड- गावडे पेट्रोल पंप- सुदर्शन नगर मार्गे मंदिरात सांगता झाली. 

या रथयात्रा फेरीत सुमारे तीनशे भाविक सहभागी झाले होते.

 यावेळी "विरा विरा - जय महाविरा," महावीर भगवान का क्या संदेश जिओ और जीने दो...  अहिंसा परमोधर्म कि जय हो ! जैनम जयतु शासनम अशा घोषणा दिल्या. 

बॅंडच्या मंगलमय तलावर महिलांनी दांडीया नृत्य केले.  

या व्यतिरिक्त मंदिरात स ९ ते ११ अभिषेक, शांतीधारा,सामूहिक पूजन,११:३० वा भगवान महावीरांचा पाळणा घेण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या शिबिरात १०५ जणांची नेत्र तपासणी केली आणि ५५ जणांनी रक्तदान केले, संध्याकाळी महाआरती असे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.  

ट्रस्टच्या माध्यमातून मुलींचे व मुलांचे वसतीगृह तथा अतिथि निवास, समाजातील नवीन पीढ़ी सुसंस्करित करण्यासाठी पाठशाला, गरजू नागरीकांसाठी वैद्यकीय व शैक्षणिक मदत आदी उपक्रम करण्यात येतात.

__