36.7°C Pune
Monday, May 20
image

कंपनी कायदाविषयक परिसंवादास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, ता. ८ : दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडिया, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने सनदी लेखापाल यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कंपनी कायदा या विषयावरच्या परिसंवादास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.


यावेळी दिल्ली येथील सीए कमल गर्ग,सीए प्रवीण कुमार, कंपनी सेक्रेटरी अनूप देशपांडे या तज्ञांनी कारो,शेड्युल्ड तीन,ऑडीट ट्रेल या विषयावर मार्गदर्शन केले.यावेळी दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ट अकौंटंट ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखाध्यक्ष सीए पंकज पाटणी, विकासाचे अध्यक्ष सचिन ढेरंगे, खजिनदार शैलेश बोरे,माजी अध्यक्ष सचिन बंसल,विजय बामणे, सुहास गार्डि, प्रसाद सराफ,संतोष संचेती, बबन डांगले आदी मान्यवर उपस्थित होते.

कंपनी कायद्यामध्ये आमूलाग्र बदल झालेले असून सनदी लेखापाल यांनी ऑडिट करताना काय काळजी घ्यावी आणि कंपनीचे अध्यक्ष किंवा संचालक यांच्या काय जबाबदाऱ्या यावर प्रकाश टाकला. यावेळी सुमारे दीडशे सीए सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिमा भिसे यांनी तर प्रास्ताविक आणि आभार पंकज पाटणी यांनी मानले.

-------------