32.86°C Pune
Monday, May 20
image

डुडुळगाव शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम



पिंपरी , ८ : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने भोसरी विधानसभा कार्यालयामार्फत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या डुडुळगाव शाळेत मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी मतदान मार्गदर्शिकेचे ( वोटिंग स्लीपचे ) वाटप करून मतदान शपथ घेण्यात आली. 

    या कार्यक्रमावेळी मतदान प्रतिज्ञा घेऊन वोटिंग स्लीपचे वाटप करण्यात आले. तसेच मतदान जनजागृती करण्यासाठी रॅली देखील काढण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार सतीश थेटे , शिक्षणाधिकारी संगीता बांगर , नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान यांनी मार्गदर्शन केले. 

    मतदान जनजागृती कार्यक्रमावेळी मतदान प्रतिज्ञा घेऊन विध्यार्थ्यांना मतदानाचा आशय विनायक भुजबळ यांनी समजावून सांगितला. तसेच विद्यार्थ्यांना सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेखा वहिले, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला जाधव, संतोष गवारे, शरद लावंड , नितीन गोडे, शंकर भवारी, राहुल दिघे हे शिक्षकवृंद आणि मतदान स्लीप वाटप करताना अमोल नागरे , सुधीर महानोर , दिपाली पवार हे उपस्थित होते. ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ घोषणा देत न.म.गडसिंग गुरुजी ज्युनियर कॉलेजच्या विध्यार्थ्यानी कृष्णानगर परिसर दुमदुमून सोडला.  लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने भोसरी विधानसभा कार्यालयांतर्गत मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीनंतर कॉलेजच्या सभागृहात जनजागृती सभा घेण्यात आली. 

      मतदान जनजागृती कार्यक्रमावेळी सी-व्हीजिल अॅप, मतदार नोंदणी अॅपबद्दल माहिती देऊन मतदान करण्याबाबत स्वीप सहाय्यक अधिकारी संजय धोत्रे यांनी मतदान करण्याचे कॉलेजवयिन विध्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आवाहन केले. 

     कॉलेजवयिन विध्यार्थी समाजमाध्यमांवर मोठ्या संख्येने सक्रीय असतात. त्यामुळे मतदान करतानाचा सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करून इतरांना मतदानाचा हक्क बजावण्यास प्रेरित करण्याचे आवाहन सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे यांनी केले.  

     यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे, तहसीलदार सतीश थेटे , शिक्षणाधिकारी संगीता बांगर , नायब तहसीलदार अपर्णा देशपांडे, सहाय्यक प्रशासन अधिकारी रजिया खान, कॉलेजचे प्राचार्य तीकटे, सहाय्यक नोडल अधिकारी अमोल फुंदे तसेच मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होता. 

    न.म.गडसिंग गुरुजी ज्युनियर कॉलेजमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन दिलीप घोलप यांनी केले होते. यावेळी खोत यांनी सर्वांचे आभार मानले. यासोबतच स्वीप सहाय्यक विनायक भुजबळ यांनी मतदान प्रतिज्ञा घेऊन सर्वांना आशय समजावून सांगितला.

------------