38.71°C Pune
Thursday, May 9
image

भगवा ध्वज नाचवत खासदार बारणे यांचा श्रीराम नवमी शोभायात्रांमध्ये सहभाग


पिंपरी, ता. १८ : श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या विविध शोभायात्रांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे बुधवारी (ता. १७) रात्री सहभागी झाले. कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत भगवा झेंडा नाचवत जल्लोषही केला. 


संभाजीनगर येथील ओम साई राम मंदिरात खासदार बारणे यांच्या हस्ते महाआरती झाली. श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठान व कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन यांच्यातर्फे खासदार बारणे यांचा सत्कार झाला. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, कविता बहल, नारायण बहिरवाडे, अमित गोरखे, अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, कुशाग्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार बारणे यांच्या हस्ते यावेळी महाप्रसादाचेही प्रातिनिधिक वाटप करण्यात आले.


शाहूनगर येथे श्री साई मित्र मंडळ व श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्टच्या श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळ्यातही खासदार बारणे सहभागी झाले. त्यावेळी अमित गोरखे, नारायण बहिरवाडे, महेश चांदगुडे, सुप्रिया चांदगुडे, अनुराधा गोरखे, निलेश वांजरे, अध्यक्ष बापू शिंदे, चंद्रकांत नेवसे, अनिल मुळे, रामदास गाढवे आदी उपस्थित होते. 


राजेश आरसूळ यांच्या पुढाकाराने आयोजित अखिल वेताळनगर रामनवमी उत्सव समिती, चिंचवडगावातील श्री मयुरेश्वर मित्र मंडळ, अखिल चिंचवडेनगर रामनवमी उत्सव तसेच कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल आयोजित शोभायात्रांमध्ये खासदार बारणे सहभागी झाले.


'जो राम को लाये है, हम उनको लायेंगे' 'अयोध्या तो झांकी है, काशी- मथुरा बाकी है' च्या घोषणांनी परिसर दणदणून गेला होता. स्वतः खासदार बारणे हातात भगवा झेंडा घेऊन शोभायात्रेतील जल्लोषात सहभागी झाले. 


काळेवाडी रहाटणीत भेटीगाठी


काळेवाडी येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष संगीता कोकणे यांच्या निवासस्थानी खासदार बारणे यांनी भेट दिली. कोकणेनगर येथील श्री भाग्यवंती देवी मंदिरात जाऊन बारणे यांनी देवीचे दर्शन घेतले. त्यावेळी पुजारी दादा पाटील व सिद्धाराम माले पाटील यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. 


माजी नगरसेविका ज्योती भारती, विनोद नढे, सागर नढे, प्रकाश मलशेट्टी, अरुण तांबे, बापूसाहेब जाधव, युवा महाराष्ट्र केसरी पैलवान किशोर नखाते यांच्या निवासस्थानी बारणे यांनी भेट दिली. खासदार बारणे यांच्या समवेत प्रदीप दळवी, शरद राणे, दिलीप कुसाळकर, अंकुश कोळेकर आदी पदाधिकारी होते.

--