33.97°C Pune
Thursday, May 9
image

पिंपरीत वधू-वर मेळाव्याला प्रतिसाद

पिंपरी, ता. ५ :  अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड आणि योगिनी वधुवर सुचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रंजना हॉल येथे आयोजित वधू-वर मेळाव्याला जवळपास ७००  हून अधिक लोकांनी हजेरी लावली होती. त्यात जवळपास ३००  इच्छुक वधू-वर उपस्थिती होते. राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर गोविंदभाऊ कुलकर्णी, श्री हेमंत हरहरे काका आणि श्रीमती रंजनाजी पाठक यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सध्या सर्व समाजामध्ये मुलींची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे मुलांची  लग्न होण्यास उशीर होत आहे, याची खंत त्यांनी बोलवून दाखवली व म्हणून आपण महासंघातर्फे या मेळाव्याचे नियोजन करण्यास सांगितले. योगिनी वधु वर सुचक मंडळाच्या वृषाली जोशी,

प्रितेश  कुलकर्णी व पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष  सचिन कुलकर्णी, कार्याध्यक्ष महेश बारसावडे, संघटन सचिव सचिन बोधनी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे मंजिरी सहस्त्रबुद्धे,  संध्या कुलकर्णी, सतीश देशपांडे, प्रियंका नंद, स्मिता देशपांडे, शुक्ला, अश्विनी मेहरूणकर, सीमा कुलकर्णी, शलाका अस्लेकर,  स्मिता येवलेकर, सतीश देशपांडे, तारे काकू, अरुण काका, नरेंद्र चिपळूणकर ,सुभाष फाटक, भाऊ कुलकर्णी, पंकज कुलकर्णी, पंकज शर्मा, दीपक शर्मा, प्रशांत कुलकर्णी, मकरंद कुलकर्णी  या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विशेष उपस्थितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस दिलीपजी कुलकर्णी पुष्कराज गोवर्धन, राजनजी बुडूख त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रसिद्ध उद्योजक भावेन पाठक यांनी रंजना बँक्वेट हा हॉल उपलब्ध करून दिला व कार्यक्रमाचे आभार मानले.  तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मदत केली.