30.39°C Pune
Thursday, May 9
image

'' निरंतर शिक्षण '' हीच यशाची गुरुकिल्ली - डॉ. संजय तलवार

पिंपरी, ता. २२ : '' आजच्या स्पर्धात्मक जगात, विद्यार्थ्यांनी प्रगत शिक्षणावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग यासारख्या साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. उच्च तंत्रज्ञानामुळे साधने कितीही वाढली, विकसित झाली तरी '' निरंतर शिक्षण '' हीच यशाची गुरुकिल्ली आहे '', असे मत डॉ. संजय तलवार यांनी नुकतेच रावेत येथे व्यक्त केले.

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये 'टेक्नोवेट-२०२४' या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

टेक्नोवेट २०२४ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित बीजीएमआय-व्हॅलोरंट, कॅड ओ क्रिएट, फास्ट अँड फ्यूरियस, आयपीएल लिलाव, एम यू एन, शार्क टॅंक, टेक-संगम एस्केप रूम, ब्रो कोड, ट्रेझर हंट अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध महाविद्यालयांतील ५०० हून अधिक स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. याचा बक्षीस वितरण समारंभ संजय तलबार यांच्या हस्ते झाला.

 पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

  प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी स्वागत केले. डॉ. सुशांत वाघमारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संतोष रणदिवे आणि डॉ. सुशांत वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विविध संस्थांचे विद्यार्थी उपस्थित होते.

----------------------------------------------