27.37°C Pune
Thursday, May 9
image

आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांचा उदंड प्रतिसाद

पिंपरी, ता. २२ : विशिष्ट शैलीतील ठसकेबाज गायकीसाठी प्रसिध्द असलेले ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या लोकगीतांना सांगवीकरांनी उदंड प्रतिसाद दिला.  

   सांगवीतील फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंर्तगत शनिवारी रात्री जुन्या सांगवीतील एकता चौकात आनंद शिंदे यांच्या लोकगीतांचा " जलसा " या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, संस्थेचे अध्यक्ष व माजी नगरसेवक संतोष कांबळे, गणेश बँकेचे संचालक संजय जगताप, ऑल इंडिया बॉडी बिल्डींग असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बाराथे, सचिव बाळासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे आदी उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिकांची तुडुंब गर्दी झाली होती. शंकर जगताप यांच्या हस्ते आनंद शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. शाहीरीच्या माध्यमातून जनप्रबोधन करण्याच्या संस्थेच्या उपक्रमाचे जगताप यांनी कौतुक केले. 

आनंद शिंदे यांनी या कार्यक्रमात भीमगीते, बुद्धगीतांपासून त्यांची प्रसिध्द असलेली अनेक बहारदार गाणी गायली. प्रेक्षकांकडून त्यांना भरभरून दाद मिळाली. सांगवीकरांच्या रसिकतेचे शिंदे यांनी आवर्जून कौतुक केले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव योगेश कांबळे यांनी तर रवींद्र यादव यांनी आभार मानले.

------- Here