39.47°C Pune
Monday, May 20
image

थाटामाटातील लग्नाची स्पर्धा कमी करावी : डॉ. देवरे


पिंपरी, ता. ९ : खान्देश मराठा मंडळाच्या वतीने आयोजित खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू- वर पालक परिचय मेळावा निगडी प्राधिकरण येथे उत्साहात झाला.

प्रमुख पाहुणे धुळे जिल्हा रुग्णालयाचे माजी आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिक देवरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर पगार, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, उपाध्यक्ष सयाजी पाटील, सचिव प्रदीप शिंदे, खजिनदार भास्कर पाटील, कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील, संजय पाटील, सुरेश पाटील, कृष्णराव अहिरराव आणि मार्गदर्शक समिती सदस्य बी.के. पाटील, माधव पवार आदी उपस्थित होते.

 मंडळाचे सचिव प्रदीप शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय माधव पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ .प्रतिक देवरे यांच्या हस्ते वधू-वर सूचीचे प्रकाशन केले.

 यावेळी डॉ. देवरे म्हणाले, '' मुलींना शिकविले पाहिजे व तिला तिच्या पायावर उभे केले पाहिजे. कारण पुण्यासारख्या शहरात दोघांना नोकरी करावी लागते. तरच चांगला संसार करू शकतात. मराठा समाजात लग्न थाटमाटात करण्याची लागलेली स्पर्धा कमी झाली पाहिजे. 

मंडळाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय मनोगतामध्ये आपल्या समाजाने कमीतकमी लोकांमध्ये विवाह सोहळा करावा, असे आवाहन केले. मिलिंद पाटील यांनी वधू-वर यांच्या परिचय पत्रकाचे वाचन केले. सुरेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. एस. आर. पाटील यांनी आभार मानले.

 कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय पाटील,रवींद्र पाटील, ज्ञानेश्र्वर एंडाईत,ज्ञानेश्र्वर पाटील,चेतन ठाकरे, अशोक पाटील, राजेंद्र देसले,राखी पाटील,दिपाली पाटील, सुनीता पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

 

---------