28.82°C Pune
Thursday, May 9
image

विजय देवरकोंडानं

Vijay Deverakonda : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता विजय देवरकोंडानं खूप कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. विजयनं त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. विजय नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. पण विजय एकदा चर्चेत आला होता आणि त्याचं कारण होतं त्यानं त्याचा पहिला फिल्मफेयर अवॉर्डचा लिलाव केला होता. हा अवॉर्ड विजयनं 25 लाख रुपयात विकला. या गोष्टीमुळे लोकांनी फक्त आश्चर्य व्यक्त केलं नव्हतं तर त्यासोबत ट्रोल देखील केलं होतं. आता विजयनं सांगितलं की त्यानं असं का केलं होतं. 

विजय देवरकोंडानं 2016 मध्ये 'पेली चूपुलु' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तर विजयला दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगाच्या 'अर्जुन रेड्डी' मध्ये केलेल्या त्याच्या अभिनयासाठी पुरस्कार पटकावला होता. तर त्याचा दुसराच चित्रपट होता. तर विजयनं या चित्रपटासाठी मिळालेल्या त्याच्या या पुरस्काराचा लिलाव का केला याचा खुलासा Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत विजयनं सांगितलं. त्यानं म्हटलं की "अवॉर्डचा लिलाव केल्यानंतर जे पैसे मिळाले ते मी दान केले आणि ही माझ्यासाठी असलेली आजवरची सगळ्यात चांगली गोष्ट आहे. मी या अवॉर्डमधून मिळालेले 25 लाख रुपयांची रक्कम ही मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीसाठी देणगी दिली."