25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

श्री परशुरामांचा जन्मोत्सव उत्साहात

पिंपरी, ता. १ : अखिल भारतिय ब्राह्मण महासंघ , पेठ विभाग, पुणे यांच्या कडून सदाशिव पेठ येथील कुमठेकर रोड च्या श्री दांडेकर राम मंदिर येथे  भगवान श्री परशुरामांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

 

विष्णुसहस्रनाम अभिषेक व पठण तसेच वैशाली बापट यांचे परशुराम जन्माचे प्रवचन, आरती व प्रसाद अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी राम मंदिरात पवित्र वातावरण निर्माण झाले होते त्याने जन्मोत्सव जल्लोषात संपन्न झाला.

 

मा. कुणाल टिळक जन्मोत्सवास आले होते. त्यामुळे कार्यक्रमास प्रेरणा मिळाली. महिला मंडळाचा उत्साह तर फारच मोठा होता. सहकारी व पदाधिकारी यांच्या स्नेहभेटीने आपुलकी वाढली. भगवान परशुरामांच्या रेखीव मूर्तीची सर्वांनी आरती केली. अशा प्रकारे राम मंदिराच्या सभोवतालचा परिसर आनंदात न्हाऊन निघाला.