30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

अंबादास दानवे आणि अरविंद सावंत यांच्या हस्ते रविवारी "उद्धव श्री" पुरस्कार वितरण सोहळा

पिंपरी, ता. १५ : शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात येणाऱ्या "उद्धव श्री २०२५" पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ आणि राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश वाटप विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि केंद्रीय मंत्री शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावर्षीचा "उद्धव श्री २०२५" पुरस्कार उद्योजक विश्व चोरडिया तसेच शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे राजेश म्हस्के यांना जाहीर झाला आहे, अशी माहिती पुरस्कार समितीचे अध्यक्ष व संयोजक माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. गौतम चाबुकस्वार आणि संयोजक सचिव माधव मुळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. रविवारी (ता. १७ ऑगस्ट) सायंकाळी पाच वाजता पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा समारंभ होणार आहे. 

प्रमुख पाहुणे म्हणून उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख आमदार सचिन आहिर, सह संपर्कप्रमुख पुणे जिल्हा आदित्य शिरोडकर, संपर्क प्रमुख भोसरी, पिंपरी विधानसभा केशरीनाथ पाटील, शिवसेना शहरप्रमुख संजोग वाघेरे पाटील, शहर संघटिका रुपाली आल्हाट आणि ॲड. असीम सरोदे आदी उपस्थित राहणार आहेत.

   "उद्धव श्री२०२५" पुरस्कारासाठी संजय आवटे (पत्रकारिता), विजय जगताप (सहारा वृद्धाश्रम), अनिल भांगडिया (उद्योजक), साजन बेंद्रे (कलाक्षेत्र), शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे (कामगार क्षेत्र), विशाल गायकवाड (कला क्षेत्र) देवा झिंजाड (लेखक), स्वाती गवारे (महिला उद्योजिका) अभिमन्यू सूर्यवंशी (क्रीडाक्षेत्र), रमेश वाघेरे पाटील (सामाजिक) यांचीही निवड करण्यात आली आहे अशी माहिती उद्धवश्री पुरस्कार समितीचे कार्याधक्ष युवराज कोकाटे, संघटक हाजी दस्तगीर मणियार, उपाध्यक्ष सुशीला पवार, संघटिका वैभवी घोडके, उपाध्यक्ष गोपाळ मोरे, सहसचिव नेताजी काशीद, खजिनदार हरेश नखाते, सह संघटक निखिल दळवी, सदस्य अभिजीत गोफण, प्रशांत तायडे, गुलाबचंद आसवानी, अशोक वाळके, कैलास नेवासकर, सावल तोतानी, संतोष म्हात्रे यांनी प्रसिद्धीस दिली आहे. 

  तसेच माजी नगरसेवक रवी लांडगे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, युवासेना अधिकारी चेतन पवार, छावा संघटना संस्थापक बाबासाहेब भोसले, उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, माजी शहरप्रमुख सचिन भोसले, मावळ तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, जिल्हा संघटिका शैला खंडागळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, तळेगाव शहर प्रमुख शंकर भेगडे, युवा सेना पुणे जिल्हाधिकारी अनिकेत घुले, सह संपर्क संघटिका शाधनभाभी चौधरी, उपजिल्हा संघटिका कल्पना शेटे, उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, उद्योजक मुकेश फाले, शिव सेनेचे सर्व विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, अंगीकृत संघटना आजी माजी पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत.

----