26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

रमजान ईदनिमित्त खासदार बारणे यांनी दिल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा !

चिंचवड, ता. १२ : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी रमजान ईदनिमित्त गुरुवारी (ता. ११) सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 


आकुर्डी येथील शिवसेनेचे विभागप्रमुख फारुख शेख तसेच चिंचवड येथील अख्तर पिंजारी, अन्वर पिंजारी, तौहीद पिंजारी तसेच हमीदभाई मुलाणी, लतिफ मुलाणी यांच्या निवासस्थानी जाऊन खासदार बारणे यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम बांधवांनी देखील खासदार बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. 


खासदार बारणे यांचे अनेक मुस्लिम कुटुंबांशी अत्यंत घरोब्याचे संबंध आहेत. मुस्लिम समाजातील कोणत्याही अडीअडचणींच्या वेळी खासदार बारणे मदतीसाठी धावून येतात. त्यामुळे मुस्लिम बांधवदेखील खासदार बारणे यांच्या पाठीशी उभे राहतात, असे हमीदभाई मुलाणी यांनी सांगितले.

-------------