26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

पुण्याहून नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचता येणार केवळ एका तासात - खासदार बारणे


काळेवाडी, ता. २२ : पुण्याहून नवी मुंबई येथे होत असलेल्या नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचता येईल, असे नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. 


खासदार बारणे यांनी वाकड व पिंपळे निलख भागातील प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. थेरगाव येथील स्वीस काऊंटी व काळेवाडी येथील सोनिगरा विहार या दोन मोठ्या सोसायट्यांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला.

काळेवाडी येथील सोनिगरा विहार सोसायटीत प्रीतम पांडे यांनी पुण्यासाठी नवीन विमानतळाच्या विषयाबाबत छेडले असता, खासदार बारणे यांनी वरील उत्तर दिले. त्यावेळी सोनिगरा विहार सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर देवरे तसेच अन्य पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


खासदार बारणे म्हणाले, '' मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये नवी मुंबई, पनवेल येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. पुण्यातून या विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचणे शक्य होईल, असे नियोजन करण्यात येत आहे. पुणे- लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण होत आहे. त्याच्या खर्चास नुकतीच मंजुरी मिळाली आहे. कर्जत- पनवेल लोहमार्गाचे काम सुरू आहे. कर्जत- लोणावळा लोहमार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. लोहमार्गाची ही कामे पूर्ण झाल्यानंतर पुणे ते पनवेल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यात येईल. पनवेल ते विमानतळापर्यंत मेट्रो सेवा सुरू होत आहे. त्यामुळे पुण्यातून नवीन विमानतळापर्यंत अवघ्या एक तासात पोहोचणे शक्य होईल. 


स्वीस काऊंटी सोसायटीमध्ये अध्यक्ष डॉ. जयंत बाहेती, कमलेश मुथा, अशोक झिलपेलवार, माजी नगरसेवक कैलास बारणे, संतोष माऊली बारणे आदींनी खासदार बारणे यांचे स्वागत केले.


वाकड परिसरात भेटीगाठी


खासदार बारणे यांनी सकाळच्या सत्रात वाकड परिसरातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्यासमवेत शिवसेना शहर प्रमुख निलेश तरस तसेच तानाजी बारणे, नितीन कान्हेरे, अथर्व खोल्लम, भरत कस्पटे आदी पदाधिकारी होते. मोहनशेठ विनोदे, भरत आल्हाट, विक्रम विनोदे, गंगाधर विनोदे, राहुल विनोदे,

पिंपळे निलख येथे हरिनाम सप्ताहास भेट


खासदार बारणे यांनी पिंपळे निलख येथे भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) सदस्य अनिल संचेती यांच्या कार्यालयास भेट दिली. माजी नगरसेविका आरती चोंधे व संकेत चोंधे, दिलीप बालवडकर, नितीन इंगवले, निखिल दळवी, संजय दळवी, निरंजन दळवी आदींच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. सर्वांनी बारणे यांचे उस्फूर्त स्वागत करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. पिंपळे निलख येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहास देखील खासदार बारणे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.

--------------