26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे लोणावळा येथे उद्घाटन


लोणावळा, ता. २४ : '' केंद्र व राज्य सरकारने घेतलेले जनहिताचे निर्णय आणि मोठ्या प्रमाणात केलेली विकासकामे कार्यकर्त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचवावीत,'' अशी सूचना मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी मंगळवारी (ता. २३) केली.


लोकसभा निवडणुकीसाठी लोणावळा येथे सुरू करण्यात आलेल्या महायुतीच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे प्रचार प्रमुख रवींद्र भेगडे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊ गुंड, शहराध्यक्ष अरुण लाड, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, शहरप्रमुख संजय भोईर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर भालेराव तसेच जीवन गायकवाड, बाळासाहेब सकट, आशिष बुटाला, विजय सकट आदी मान्यवर उपस्थित होते. 


खासदार बारणे म्हणाले, '' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये मोठ्या प्रमाणात 

विकासकामे झाल्याने तसेच देशहिताचे महत्त्वपूर्ण निर्णय झाल्यामुळे देशवासीयांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.'' लोणावळा परिसरात केलेल्या विविध विकास कामांची माहिती देखील खासदार बारणे यांनी यावेळी दिली. 


त्यापूर्वी खासदार बारणे यांनी लोणावळ्यातील काही मान्यवरांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. हनुमान जयंती उत्सवानिमित्त काही मंदिरात जाऊन दर्शन घेतले. माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, प्रमोद गायकवाड, संजय अडसूळे आदींच्या निवासस्थानी भेट दिली. नांगरगाव येथील लोणावळा औद्योगिक सहकारी वसाहतीच्या कार्यालयात जाऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. अध्यक्ष संदीप कोराड, उपाध्यक्ष शीतल पतंगे, संचालक नितीन सोनवणे तसेच लहू भोकसे आदींनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. 


तुंगार्ली येथील जाखमाता देवी मंदिर, हनुमान मंदिर, खंडाळा येथील जय मल्हार मित्र मंडळाचे श्री खंडोबा देवस्थान, खोंडगेवाडी येथील हनुमान तरुण मंडळाचा हनुमान जन्मोत्सव, सिद्धार्थ नगर येथील श्री संत रोहिदास तरुण मंडळ, जेतवन विहार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन या ठिकाणीही खासदार बारणे यांनी भेट दिली. जेतन विहार येथे विजय जाधव, संजय अडसुळे, प्रफुल्ल काकडे, योगेश अडसुळे, गौतम गायकवाड, उषा जाधव, सुरेखा चौरे, प्रभाकर गायकवाड आदींनी बारणे यांचा सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.

--------