विविध उपक्रमांनी निगडीत सीए दिन साजरा
पिंपरी, ता. १ : निगडी येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ़ चॅर्टर्ड अकौंटंट ऑफ़ इंडिया(आयसीएआय) च्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने विविध उपक्रमांनी सीए दिन नुकताच साजरा करण्यात आला.
यावेळी आयसीएआयचे अध्यक्ष सीए पंकज पाटणी यांच्या हस्ते निगडी येथील कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयसीएआयच्या प्रादेशिक परिषदेचे माजी सदस्य अशोककुमार पगारीया, किशोर गुजर, आयसीएआय पिंपरी चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष वैभव मोदी, सचिव सारिका चोरडिया, खजिनदार शैलेश बोरे, विकासा अध्यक्ष सचिन ढेरंगे, माजी अध्यक्ष सचिन बंसल,सुहास गार्डी, विजय बामणे, संतोष संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिरात ३५ जणांनी रक्तदान केले. १५०जणांची मोफत नेत्र तपासणी केली. दुर्गा टेकडी येथे वृक्षारोपण करून दुर्गा टेकडी येथे स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. रूपीनगर येथील नव महाराष्ट्र विद्यालयातील ६० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
------------
