26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपळे निलखमध्ये ज्ञानदायी उपक्रम

पिंपरी, ता. ८ : पिंपरी चिंचवड शहर युवक अध्यक्ष रविराज काळे यांच्या पुढाकाराने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पिंपळे निलख येथील अंगणवाडीत नुकताच एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या वेळी अंगणवाडीतील लहानग्यांना पाटी, पेन्सिल, डस्टर, कलर,आणि खाऊ भेट देण्यात आला. तसेच अंगणवाडीला एक नवीन फळा भेट देऊन शिक्षणासाठी उपयुक्त साधनांची जोड देण्यात आली.


छोट्या वयातच ज्ञानाचं शस्त्र हाती देणं म्हणजे शिवरायांना खरी आदरांजली असल्याचा विचार यामागे होता. बालवयात शिक्षणाची गोडी लावणं, हीच खरी संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात शिक्षण हा मूलभूत हक्क होता, आणि आजच्या काळातही तो विचार जपला गेला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. रविराज काळे यांनी सांगितले की, “हा उपक्रम लहान असला तरी मोठ्या सामाजिक परिवर्तनाचं बीज रोवणारा आहे. शिक्षण हाच खरा बदलाचा पाया आहे.” या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून व अंगणवाडी सेविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


--------------