25.78°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्री तुळशीबाग मंडळाचे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.....

पुणे, ता. १ : मानाचा चौथा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आणि रुद्रांग वाद्य पथक ट्रस्ट, पुणे, स्वरूप वर्धिनी, शिवमुद्रा, गजलक्ष्मी यांच्या संयुक्त विद्यमाने शतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


हे शिबिर रविवार, दि. ३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन नु. म. वि. शाळा, बाजीराव रोड येथे होणार आहे. पुणेकरांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन गरजूंना जीवनदान द्यावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.


"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संकल्पनेतून घेण्यात आलेले हे उपक्रम शतकोत्तर गौरवाचा एक महत्त्वाचा भाग ठरणार आहे.

--------