27.45°C Pune
Monday, September 14
Breaking News:
image

शाहू कॉलेजच्या प्राध्यापकांच्या डिझाईनला पेटंट

पिंपरी, ता. १० : जेएसपीएम संचालित ताथवडे येथील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या यांत्रिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापकांना ' युनायटेड किंगडम 'चे पेटंट मंजूर आणि प्रकाशित झाले आहे.


डॉ. पृथ्वीराज पाटील, डॉ. शैलेश पिंपळे, डॉ. विठोबा तळे, डॉ. जितेंद्र होले, प्रा. रुपेश सुंडगे आणि प्रा.महेश कदम असे पेटंट प्राप्त प्राध्यापकांची नावे आहे. या प्राध्याकांनी पोर्टेबल बायोडिझेल रिॲक्टरचे डिझाईन केले आहे . पोर्टेबल बायोडिझेल रिॲक्टर बायोडिझेल उत्पादनाच्या आवश्यक टप्प्यांना कॉम्पॅक्ट सिस्टममध्ये एकत्रित करून कार्य करते. यासाठी जैव कचरा, टाकाऊ तेल इत्यादी साहित्यांचा वापर होणार आहे. पारंपारिक इंधनाशी संबंधित कचरा आणि पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यास यामुळे मदत होणार आहे


संचालक डॉ.संतोष भोसले , उपसंचालक डॉ.अविनाश देवस्थळी, कॅम्पस डायरेक्टर डॉ.सुधीर भिलारे व विभागप्रमुख डॉ.सुबीम खान यांचे सहकार्य मिळाले.

--------------