स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन....
पिंपरी, ता. २८ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल सुभाष देवकाते, योगेश गव्हाणे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
-------------