23.41°C Pune
Monday, March 16
Breaking News:
image

रावेतमधील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

पिंपरी, ता. ७ : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या पटांगणात माध्यमिकच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. वसुंधरेच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि त्याचे संगोपन हाच एकमेव उपाय असल्याचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. 


'प्लास्टिकच्या प्रदूषणाचा अंत' ही या वर्षाची संकल्पना होती. यामध्ये “पृथ्वी आमच्या वर्गात आहे” ही स्वरचित कविता विद्यार्थ्यांनी सादर केली. पॉवरपॉईंट द्वारे वातावरणातील संभाव्य धोके आणि उपाययोजना याचे सादरीकरण केले. 'एक पेड माँ के नाम' या सीबीएससीच्या मोहिमेअंतर्गत भारत सरकारच्या उपक्रमाची माहिती देण्यात आली आणि याविषयावर मनोरंजक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. अशा उपक्रमामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी व्यक्त केला. 

यावेळी उपप्राचार्या पद्मावती बंडा, मुख्याध्यपिका शुभांगी कुलकर्णी, समन्वयिका निरुपमा काळे, वंदना सांगळे, दर्शन कामत, अर्चना प्रभुणे, सुप्रिया नितीन, सुजाता भोईटे, क्रांती कुलकर्णी व शिक्षकवर्ग उपस्थित होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विद्यार्थी व शिक्षकांना शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले. 

------------------------------------