रोटरी निगडीच्या अध्यक्षपदी सुहास ढमाले तर सचिवपदी रवींद्र कदम
पिंपरी, ता. ७ : रोटरी क्लब निगडीच्या अध्यक्षपदी रो. सुहास ढमाले तर सचिवपदी रो. डॉ रवींद्र कदम यांची निवड करण्यात आली.
क्लबच्या सर्व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा रावेत येथे झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल शीतल शहा , सहाय्यक प्रांतपाल प्रा. शिल्पागौरी गणपुले उपस्थित होते. अध्यक्ष सुहास ढमाले यांनी समाजाप्रती प्रामाणिकपणे आणि जबाबदारीच्या भावनेने सामाजिक कार्य करण्याचे आणि रोटरीची जादू सर्वत्र पोचविण्यास आम्ही वचनबद्ध असल्याचे सांगितले. सर्व संचालकांनी देखील सामाजिक कार्य करण्याची शपथ घेतली.
कार्यकारिणी मंडळ - सुहास ढमाले (अध्यक्ष), हरबिंदर सिंग (माजी अध्यक्ष),केशव मानगे (नियोजित अध्यक्ष), शशांक फडके (उपाध्यक्ष), डॉ रवींद्र कदम (सचिव), गुरदीपसिंग (प्रशासकीय), आश्विन कुलकर्णी (सेवा), मुकुंद मुळे (वैद्यकीय),विनोद बंसल(खजिनदार), सुनील जोशी (प्रसिद्धी प्रमुख), राकेश श्रीवास्तव (माहिती तंत्रज्ञान ), विजय काळभोर(फौंडेशन ), जयंत येवले (सीएसआर), अंकाजी पाटील (मेंबरशिप), रवी राजापूरकर (ग्लोबल ग्रॅण्ट), रमेश राव (विशेष प्रकल्प), गणेश भालेराव (युवा),अनिल कुलकर्णी (देखरेख), जगमोहन सिंग ( प्रशिक्षण), राणू सिंघानिया ( प्रशांतता),सुभाष जयसिंघानी (नियंत्रण), शुभांगी कोठारी ( प्रांत संयोजक ).
----------