30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

रमणलाल आणि आशाबाई लुंकड या दांपत्यास आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पुणे, ता. ७ : सूर्यादत्त एज्युकेशन फौंडेशन संचलित बन्सीरत्ना वेलफेअर ट्रस्टच्या वतीने रमणलाल लुंकड आणि आशाबाई लुंकड या दांपत्यास आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. लुंकड यांना नुकताच मुंबईत जैन महामंडळाच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लुंकड उभयतांनी आपल्या मुलांना उद्योग नीतीसोबतच जीवनात जगा आणि जगवा असा संदेश दिला. 

त्यांच्यासह त्यांची नवी पिढी उद्योगासह सामाजिक, अध्यात्मिक, क्षेत्रात हिरीरीने सहभागी होत असताना पहायला मिळत आहे. उत्तम संस्कार देऊन एकत्र कुटुंब पद्धतीचा वास्तूपाठ घालून दिला. या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


रसिकलाल एम धारिवाल श्वेतांबर स्थानक भवन बिबवेवाडी पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी परम विशिष्ट सेवा मेडल विजेते एअर मार्शल (नि) भूषण गोखले, अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक अध्यक्ष आचार्य डॉ लोकेश मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार, अभिनेता गायक अबू मलिक, बन्सी रत्न वेलफेअर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ संजय चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.


श्री लुंकड यांनी नाशिक येथील सामन गाव येथे मातोश्री वृद्धाश्रमास स्वखर्चाने एका इमारतीचे बांधकाम केले असून मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्राम विकास मंडळाला स्वखर्चाने एक इमारत बांधून दिली. लुंकड यांना जैन समाजाचा अति प्रतिष्ठित भामाशा पुरस्कार, समाजरत्न,चिंतामणी ज्ञानपीठाचा गुरुजन गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा सर्व्हिस एक्सलन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. या कार्यासाठी त्यांना म्हसोबा ट्रस्टने दिलेला हा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला.

-----