26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

रहाटणी-पिंपळे सौदागर येथील योगा पार्कचे काम अंतिम टप्प्यात

पिंपरी, ता. ८ : पिंपळे सौदागर येथे बनविण्यात येणार्या योगा पार्कच्या विकास कामाची पाहणी मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील व अधिकरी यांच्या समवेत पाहणी केली.

 नागरिकांसाठी विविध सोयीसुविधायुक्त असे योगा पार्क साकारण्यात येत आहे. यामध्ये १८ मीटर उंचीची बोल्डरिगं वॅाल, २१ मीटर स्पीड वॅाल, २१ मीटर लीड वॅाल, लहान मुलासाठी विविध खेळणी प्रकार, ज्येष्ठांसाठी  बैठक व्यवस्था, स्वतंत्र योगा व्यायामासाठी व्यवस्था, वॅाकीग ट्रॅक, प्रशस्त गार्डन व्यवस्था बनविण्यात आली आहे, या योगा पार्कमध्ये बनविण्यात आलेली क्लायबिगं वॅाल ही अशिया मधील सर्वात मोठी वॅाल आहे. या वॅालमध्ये सराव करणाri मुले ही राष्ट्रीय पातळीवर  खेळतील अशी अपेक्षा नाना काटे यांनी यावेळी व्यक्त केली. 

या पाहणीवेळी शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सहशहर अभियंता मनोज सेठीया, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत कोल्हे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक चव्हाण, उद्यान विभागाचे उपअभियंता गोसावी, शिर्के कंपनीचे लावंड, स्वामी, जाधव, शिखर संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस श्रीकृष्ण कडुसकर, व इतर सहकारी उपस्थित होते.

-------