24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

पीसीसीओईच्या विद्यार्थ्यांना जपानी संस्कृती अभ्यासाची संधी - यागी कोजी


पिंपरी, ता. २ : '' जपानला आधुनिक तंत्रज्ञाना बरोबरच कला, संस्कृती, धार्मिक इतिहास आहे. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जपानमध्ये यायचे आहे त्यांना जपानी संस्कृती, भाषा अभ्यासाची संधी ' रिड जपान प्रोजेक्ट ' या प्रकल्पामुळे मिळाली आहे.‌ या संधीचा विद्यार्थ्यांनी फायदा घेतला पाहिजे, असे मत मुंबईतील जपानचे महावाणिज्य दूत यागी कोजी यांनी नुकतेच निगडी येथे व्यक्त केले.

  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे जपान सुविधा केंद्रांतर्गत टोकियो फाउंडेशन आणि धोरण संशोधन, निप्पॉन फाउंडेशन यांच्या वतीने दीडशे पुस्तकं भेट देण्यात आली. यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जपानी भाषा विभागातील डॉ. हरी दामले, प्रोसीड टेक्नॉलॉजीजच्या स्वाती भागवत, समीर लघाटे, फिडेल टेक्नॉलॉजीज, टोकियो, जपानच्या प्राची कुलकर्णी, सिमिटीस्यु फॅक्टरी ऑटोमेशन ग्रुप व्यवस्थापकीय संचालक हैदर आलम खान, भाषा अकादमी, पुणेचे दीपक पागे, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या प्रमुख डॉ. रोशनी राऊत, विविध विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक उपस्थित होते. पीसीईटीच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

 पीसीईटीने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठे, संस्था यांच्या बरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत. विद्यार्थ्यांना जपानी संस्कृतीशी ओळख होण्यासाठी 'रिड जपान प्रोजेक्ट' उपयुक्त ठरेल, असे डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले.

  पीसीईटीचा ३६ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी करार - डॉ. गिरीश देसाई 


 पीसीईटीने ३६ आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत सामंजस्य करार केले आहेत. फ्रांस मधील नैंसी पॉलीटेक, लॉरेन विद्यापीठ येथील २ विद्यार्थी "३ डी कॉन्क्रेट प्रिंटिंग" या विषयावर पीसीसीओई मध्ये ४ महिन्यांच्या इंटर्नशिप करत आहेत. विद्यार्थी नेपाळ, बांगलादेशातील बरेच विद्यार्थी पीसीसीओई मध्ये शिक्षण घेत आहेत. तसेच सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका यासारख्या देशातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत. पीसीसीओई मधून देखील परदेशी पीएचडी आणि पोस्ट डॉक्टरेट अभ्यासासाठी प्राध्यापकांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीसीसीओईचे विद्यार्थी जून २०२४ मध्ये एलएसआय विकास आणि संशोधन लॅब जपानमध्ये इंटर्नशिप करणार आहेत. तसेच श्रीलंका, भूतान, दक्षिण आफ्रिका, सिंगापुर यांसारख्या अनेक देशांचे वाणिज्य दूतावासातील अधिकारी पीसीईटीला भेट देत असतात, अशी माहिती डॉ. गिरीश देसाई यांनी दिली.

  पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

------------------------------------------------------