26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

पीसीसीओई मध्ये ' क्षितिज - २४ ' प्रदर्शनात दोनशे कंपन्यांचा सहभाग


पिंपरी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे (पीसीसीओई) आयोजित ' क्षितिज २४ ' प्रकल्प सादरीकरण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ, तांत्रिक माहिती, प्रकल्पाची सामाजिक उपयुक्तता याबाबत विचार करण्यास प्रवृत्त करते. यामध्ये संशोधन, नाविन्यता यांचा सुरेख मेळ सर्वच प्रकल्पां मध्ये दिसून आला, असे मत जर्मनीतील हेन्केल इनोव्हेशनच्या प्रमुख नवी ओ रिअली यांनी व्यक्त केले.

  पीसीसीओई मध्ये अभियांत्रिकीच्या‌ अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेले ४३ प्रकल्प 'क्षितिज २४' मध्ये सादर करण्यात आले. यामध्ये पेटंट अनुदान मिळालेले १७, पेटंट दाखल केलेले १४ तर व्यावसायिक १२ प्रकल्पांचा समावेश होता. प्रदर्शनास दोनशेहून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदविला.

 यावेळी टीसीएसचे आंतरराष्ट्रीय उत्पादन विभाग प्रमुख प्रविण भामरे, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे, सहाय्यक अधिष्ठाता डॉ. नरेंद्र देवरे, संशोधन आणि विकास विभागाच्या अधिष्ठाता डॉ. स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.

  विद्यार्थ्यांनी ' क्षितिज -२४ ' मध्ये सादर केलेले प्रकल्प अभ्यासपूर्ण आणि सामाजिक गरज ओळखून विचारपूर्वक निवडले आहेत, असे दिसून येते. यातून जास्तीत जास्त प्रकल्प हे व्यावसायिकदृष्टया पुढे जावेत आणि स्टार्टअपमध्ये रूपांतरित झाले पाहिजेत. पीसीसीओईचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे, असे डॉ. प्रविण भामरे म्हणाले.

 पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

प्रास्ताविक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. स्वागत डॉ. नरेंद्र देवरे यांनी केले. आभार डॉ. स्वाती शिंदे यांनी मानले.

------------------------------------------------