24.67°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

पिंपरी - चिंचवड शहर उपजिविका कृती आराखड्याअंतर्गत सर्वेक्षणाला नागरिकांचा प्रतिसाद

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांच्या नेतृत्वाखाली ‘ शहर उपजीविका कृती आराखडा (City Livelihood Action Plan - C-LAP) ’ तयार करण्यात आल आहे. या अंतर्गत समाज विकास विभागाच्या वतीने प्रतिनिधींच्या माध्यमातून मंगळवार (ता. ३ ) पासून प्रातिनिधिक पाहणीला सुरुवात झाली. या पाहणीला स्थानिक नागरिकांच्या प्रतिसादामुळे पहिल्याच दिवशी ३५० हून अधिक नागरिकांची पाहणी पूर्ण करण्यात आला आहे. शहराच्या विविध भागात पुढील सहा दिवस हा सर्वे सुरु राहणार आहे. 


पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वसमावेशक व शाश्वत विकासासाठी हे चर्चासत्र महत्त्वपूर्ण असून, त्यात मिळणारे अनुभव व सूचना शहर उपजीविका कृती आराखडा (C-LAP) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरणार असून २६ ते ३१ मे या कालावधीत शहरातील लोकसंख्येचे वयोमान, लिंग प्रमाण, कामगारांची संख्या तसेच रोजगाराचे स्वरूप, औपचारिक व अनौपचारिक क्षेत्र आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, झोपडपट्टीवासी, दिव्यांग, तृतीयपंथीय, महिला वर्गाची सामाजिक व आर्थिक स्थिती जाणून घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरूपात सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवसी ३५० नागरिकांची पाहणी करण्यात आली आहे. 



चौकट - 


पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे सक्षमीकरण साध्य करण्यासाठी “शहर उपजीविका कृती आराखडा (City Livelihood Action Plan - C-LAP)” तयार केला आहे. हा आराखडा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या 'राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान' (DAY-NULM) अंतर्गत तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक शहराचे सामाजिक, आर्थिक आणि भौगोलिक वैशिष्ट्य वेगळे असल्याने, उपजीविकेच्या गरजाही त्या त्या शहरानुसार वेगळ्या असतात. त्यामुळे, शहरातील उपलब्ध साधनसंपत्ती, रोजगार क्षेत्र, श्रमशक्तीची उपलब्धता आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा विचार करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.


हा कृती आराखडा शहरातील उपजीविकेच्या सद्यस्थितीचे मूल्यमापन करण्यासाठी आणि पुढील पाच वर्षांमध्ये कोणत्या क्षेत्रात संधी निर्माण होऊ शकतात, याचे विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यानुसार विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, पतपुरवठा, स्वयंरोजगार, वित्तीय साक्षरता, कौशल्य विकास व समाजकल्याण कार्यक्रमांची आखणी केली जात आहे.

—-----


कोट - १ 


 शहराच्या समतोल, सहभागी आणि शाश्वत विकासासाठी हा आराखडा एक महत्वाकांक्षी पाऊल ठरणार आहे, त्यासाठी शहरातील नागरिकांनी पाहणी करणाऱ्या प्रतिनिधींना सहकार्य करावे 


- प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त १, पिंपरी चिंचवड महानगरपालिका 

—-