पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संवाद यात्रेचे आयोजन
पिंपरी, ता. ५ : मागील सात वर्षांपासून पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना शिक्षण, पाणी, वाहतूक, आरोग्य, कचरा, प्रदूषण, बेरोजगारी, वाढती गुन्हेगारी, बेरोजगारी, महिला सुरक्षितता अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडविण्यात राज्य सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. या सामान्य नागरिकांचा आवाज भ्रष्टाचारात बुडालेल्या आणि कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या समोर मांडण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीने रविवार (ता. ७) पासून आकुर्डी परिसरातून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.
सकाळी ९ वाजता, आकुर्डी, दत्तवाडी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून संवाद यात्रा सुरू होईल. आकुर्डी विठ्ठल मंदिर - खंडोबा माळ - काळभोर नगर मोहन नगर - गाय वासरू चौकात सभा घेऊन संवाद यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघातील आठही प्रभागात दर रविवारी ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे अशी माहिती सामाजिक न्याय विभागाचे शहर अध्यक्ष मयूर जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
तसेच पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघातून सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मी अनेक सामाजिक उपक्रम राबविले असून आगमी विधानसभा निवडणुकीत मला उमेदवारी द्यावी अशी ही मागणी मी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्याकडे केली असल्याची माहिती मयूर जाधव यांनी यावेळी दिली.
-----