पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न पं. भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सवाचे आयोजन
पिंपरी, ता. २४ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिन महोत्सव २५ आणि २६ जून २०२५ रोजी आकुर्डी प्राधिकरण येथील ग. दि. माडगुळकर सभागृह येथे होणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवात नामवंत गायकांचे गायन कार्यक्रम होणार आहेत. या विशेष कार्यक्रमासाठी सर्वांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. याचा जास्तीतजास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे.
२५ जून (बुधवार) रोजी सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ तबला वादक पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर यांच्या ‘तालयात्रा’ या विशेष कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा ‘मंगलदीप’ हा कार्यक्रम होईल.
२६ जून (गुरुवार) रोजी अकादमी विद्यार्थ्यांचे सादरीकरण सायंकाळी ५.३० पासून सुरू होईल. गायक रामेश्वर डांगे व गायिका स्मिता देशमुख यांचे शास्त्रीय गायन तर गायक मिलिंद दलाल यांच्या सुगम गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता प्रसिद्ध गायिका विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या शास्त्रीय गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे.
.....
कोट १
महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम आयोजित करून तरुण पिढीला शास्त्रीय संगीताची ओळख करून देण्याचा उद्देश असून जास्तीतजास्त संगीत प्रेमींनी या कार्यक्रमांचा आनंद घ्यावा.
- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
—---------
