25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना मान्यता...

पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक झाली, बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शेखर सिंह होते. यावेळी सादर करण्यात आलेल्या विविध विषयांची माहिती घेत आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली व शहरात सुरु असलेल्या विकासकामांचा विभागनिहाय आढावाही घेतला. 


या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर,नगरसचिव मुकेश कोळप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.


स्थायी समिती बैठकीत प्रभाग ४ बोपखेल येथील स्मशानभूमीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पर्यावरण पूरक एअर पोल्युशन कंट्रोल युनिटसाठी वीजपुरवठा मीटरकरिता महावितरण विभागाला रक्कम अदा करणे, प्रभाग ४ बोपखेल येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या पर्यावरण पूरक एअर पोल्युशन कंट्रोल युनिटसाठी वीजपुरवठा मीटरकरिता महावितरण विभागाला राक्क्कम अदा करणे, प्रभाग क्र. १५ निगडी प्राधिकरण स्थापत्य विषयक दुरुस्ती कामे करणे, प्रभाग क्र. १० व १४ मधील पाणी पुरवठा दुरुस्ती व नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करणे, सांगवी येथील आरक्षण क्र. ३४१ याठिकाणी सांगवी हॉस्पिटलकरिता जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधणीसाठी वास्तूरचनाकार नेमणे, अग्निशमन विभागाच्या अत्यावश्यक सेवेकरिता वापरण्यासाठी पूरजन्य परिस्थितीमध्ये अत्यावश्यक कामकाजाचे ऑन बोट मोटार (OBM) च्या ३ नगांची दुरुस्ती खर्चास मान्यता देणे, औद्योगिक इमारत, कारखाने, व्यवसाय अग्निसुरक्षा पूर्तता प्रमाणपत्राचे सुधारित सेवा शुल्क निश्चित करणेकमी मा, प्रशासक यांची मान्यता घेणे, प्रभाग १५ नद्गील निगडी ट्रान्सपोर्टनगर येथील मोकळ्या जागेत स्वच्छतागृहांची निर्मिती करणेबाबत, बायोमेट्रिक फेस रीडिंग व फिंगर प्रिंट मशीन देखभाल व दुरुस्ती कामास मुदतवाढ देणे , दिव्यांग व्यक्तींना फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी एजन्सी नेमणूक करणे, ई क्षेत्रीय कार्यालय इमारतीमध्ये अतिरिक्त वीजभार घेण्यासाठी महावितरणला रक्कम अदा करणे, रुग्णालयीन कामकाजासाठी वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तसेच इतर स्टाफ व कर्मचारी आउट सोर्सिंग द्वारे मनुष्यबळ पुरवठा करणे, स्वच्छ भारत मिशन अतर्गत स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत विविध कामे करणे व ई वेस्ट प्रकल्पांची शॉर्ट व्हिडीओ फिल्म बनविणे, मुख्य इमारतीच्या आवारातील उपहारगृह ची जागा ५ वर्षाकरिता भाडे तत्वावर देणे, सेक्टर नं. २८ संत ज्ञानेश्वर महाराज उद्याना जवळील संजय काळे सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या खर्चास मान्यता देणे, मनपा नर्सरी मध्ये वृक्षारोपणासाठी रोपे तयार करून देखभाल करणे, शहरातील विविध रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, चौक, या करिता लागवडीसाठी हंगामी रोपे आवश्यकतेनुसार पुरविणे, नगर सचिव विभागाकडील कर्मचाऱ्यांच्या राज मंजूर करणे, तसेच प्रभाग क्र. ३ मोशी येथील सर्वे क्र. ५७५ ते स. नं २५२ पर्यंतचा ३० मीटर डीपी रस्त्यांचे उर्वरित कामे करणे त्याच्या स्थळ बदलास मान्यता देणे, रावेत येथे इस्कॉन मंदिर येथे येणाऱ्या भाविकांसाठी पेठ क्र. २९ रावेत, खुली जागा क्र. ६ टोवर लाईन खालील क्षेत्र आनंद विहार रेणुका वृदांवन इमारत शेजारी या ठिकाणी ११ महिने कालावधीसाठी विनामुल्य पार्किंग देण्यास मान्यता देणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

-------------