26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

पिंपळे सौदागरला १२ हजार गणेशमूर्तीचे संकलन

पिंपळे सौदागर, ता. १९ : पवना नदी प्रदूषण टाळण्यासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनच्या या वर्षीही पुढाकार घेण्यात आला. या मध्ये परिसरातील नागरिकांना मूर्ती व निर्माल्य विसर्जित न करता सर्व गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले.


मागील आठ वर्षांपासून हा उपक्रम पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील महादेव मंदिर घाटावर राबविण्यात येत आहे, यात परिसरातील घरगुती व गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती नदीमध्ये विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन नगरसेवक नाना काटे यांच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला गणेशभक्तांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यात रहाटणी, पिंपळे सौदागर व पिंपरी येथील घरगुती व सार्वजनिक अशा एकूण १२ हजार ३०० मूर्ती दान करण्यात आल्या.

-----