31.34°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित ‘पुण्यश्लोक’ भव्य महानाट्य, महिलांसाठी कार्यक्रम, व्याखानाचे आयोजन

पिंपरी, ता. २९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रबोधन पर्वाचे आयोजन केले जाते. यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे त्रिशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन आले आहे. 


पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे २९ व ३० मे रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहेत. या प्रबोधन पर्वाचे उद्घाटन गुरुवारी दुपारी १२ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर,संत तुकारामनगर येथे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. 


या तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्वाभिमानी व आदर्श वाटचालीचे दर्शन घडवणारे ‘पुण्यश्लोक’ हे ६४ कलाकारांचे भव्य महानाट्य, महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडवणारा लोकोत्सव कार्यक्रम, लोकसंगीताचा कार्यक्रम, खास महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित सुप्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे यांचे व्याख्यान होणार आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी दिली आहे. 


—----------

विचार प्रबोधन पर्वाचे वेळापत्रक 


शुक्रवार (ता. ३०) 

दु. ३ वा. 

‘लोकोत्सव’

महाराष्ट्राच्या प्राचीन संस्कृतीचे दर्शन 

(भूपाळी, वासुदेव, पिंगळा, वाघ्या, मुरली, धनगरी नृत्य, 

शाहिरी पोवाडे, आदिवासी, डोंबारी नृत्य असे विविध कार्यक्रम,)


 

—--

सायं. ५ वा. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान 

सुप्रसिद्ध व्याख्याते - नितीन बानगुडे पाटील 


स्थळ- आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी 

—-----


३१ मे 


सकाळी १०.३० वा.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस

 पुष्पहार अर्पण व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या बोधचिन्हाचे शासकीय पत्रव्यवहारात वापराबाबत अनावरण 


स्थळ- महापालिका प्रशासकीय भवन 

—--

सकाळी १०.४५ वा. 

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सांगवी

 येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 

पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन 


स्थळ - सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा पुतळा परिसर..

—---

सकाळी ११.१५ वा.

आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते मोरवाडी

 येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 

पुतळ्यास पुष्पहार अर्पण व अभिवादन 


स्थळ- मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा परिसर

—-

दुपारी ४ वा. 

लोकसंगीताचा कार्यक्रम 

सादरकर्ते - समर्थ कला मंच सॉंग व ड्रामा 


स्थळ- मोरवाडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा 

—-------------