26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात


पिंपरी, ता. ३१ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

  महापालिकेच्या  पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील त्यांच्या प्रतिमेस तसेच मोरवाडी पिंपरी आणि सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


प्रशासकीय भवनातील कार्यक्रमास आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, उप आयुक्त संदीप खोत, उप अभियंता विजय भोजने, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.


सांगवी येथील कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता दिलीप धुमाळ, संतोष दुर्गे, सहाय्यक आरोग्याधिकारी अंकुश झिटे तसेच नागरिक उपस्थित होते.                                      


------