23.41°C Pune
Monday, March 16
Breaking News:
image

पीएमआरडीएतर्फे वारकऱ्यांचे स्वागत अन् सोयी सुविधा

पिंपरी, ता. २४ : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे भाविकांचे स्वागत आणि त्यांना सोयी - सुविधा पुरविण्यात आल्या. पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर आलेल्या भाविकांसाठी पीएमआरडीएतर्फे दोन ठिकाणी स्वागत केंद्र उभारून छायेसाठी निवारा शेड, शुद्ध पिण्याचे पाणी, मास्क व बिस्कीट वाटप, अग्निशमन पथक सेवेवर कार्यरत होते. 


संत तुकाराम महाराज पालखीचे कदम वाकवस्ती लोणी काळभोर तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वडकी नाला, हडपसर – सासवड- जेजुरी रस्त्यावर पीएमआरडीएतर्फे वारकऱ्यांसाठी स्वागत केंद्र उभारून प्रत्येक वारीचे शाल - श्रीफळ देऊन त्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या. यावेळी अधीक्षक अभियंता प्रभाकर वसईकर, अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी, उप-अभियंता सुभाष मोरे, अरविंद माळी, जितेंद्र पगार, जयेश भदाणे यांच्यासह पीएमआरडीएचे कर्मचारी उपस्थित होते.

-------------