नामवंत व्यावसायिक अशोक पारळकर यांचे निधन
पिंपरी, ता. २८ : पिंपळे निलख येथील रहिवासी व नामवंत व्यावसायिक अशोक भालचंद्र पारळकर (वय ६६) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योग, सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या पश्चात आई, दोन बंधू, दोन बहिणी, पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे. अशोक पारळकर हे उद्योग क्षेत्रात एक प्रथितयश आणि विश्वसनीय नाव मानले जात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक यशस्वी उपक्रम उभे राहिले. त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातही त्यांचा प्रभाव होता. वारकरी संप्रदायात त्यांनी अनेक वर्षे निष्ठेने सेवा केली. ते टाटा मोटर्सचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी मनोहर पारळकर आणि निवृत्त शासकीय स्थापत्य अभियंता विनायक पारळकर यांचे धाकटे बंधू होते.
---
