30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

निगडितील शिबिरात ८० जणांचे रक्तदान

पिंपरी, ता. १८ : निगडी (प्रतिनिधी) लायन्स क्लब इंटरनॅशनल, श्रीकृष्ण चॅरिटेबल फाऊंडेशन निगडी व मॉडर्न शैक्षणिक संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण मंदिरात झालेल्या ३६ व्या रक्तदान शिबिराला यंदाही चांगला प्रतिसाद मिळाला.

मंदिराचे अध्यक्ष कै.हरिदास नायर यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या शिबिरात ८० रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. लायन्सतर्फे त्यांना ५ लाख रुपयांची विमा पॉलिसी भेट म्हणून देण्यात आली.

   रक्तदान शिबिराचे उदघाटन लायन्सचे माजी प्रांतपाल बाळकृष्ण जोशी यांनी केले प्रसंगी लायन्स रिजन अधिकारी शैलजा सांगळे, झोन अधिकारी मीनांजली मोहिते, अनिल भांगडीया, रक्तदान प्रांत अधिकारी, डॉ. नंदकिशोर जाजू व अनिल झोपे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हर्ष नायर,रश्मी नायर व राजीव कुटे यांनी केले.

   समारोपप्रसंगी हर्ष नायर यांनी प्रास्ताविकमध्ये बोलताना दिवंगत हरिदास नायर यांनी प्रारंभ केलेली रक्तदान मोहीम चे उद्दिष्ट व महत्त्व विषद केले. या प्रसंगी लायन्सचे प्रांतपाल विजय सारडा, उपप्रांतपाल राजेश अगरवाल, माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी, माजी प्रांतपाल शरदचंद्र पाटणकर यांनी मार्गदर्शन केले.

 आधार ब्लड बँकचे डॉ. मकरंद शाहपुरकर यांनी सद्य परिस्थितीत आवश्यक रक्तदान शिबीराविषयी आवाहन केले. यावेळी रिजन मधील २० लायन्स क्लब चे पदाधिकारी असे सुमारे ३०० सदस्य उपस्थित होते.

    सूत्रसंचालन राजीव कुटे यांनी तर आभार प्रदर्शन प्रशांत गोमकाळे यांनी मानले. या रक्तदान शिबिरात डिस्ट्रिक्ट ३२३४ -डी २ रिजन ३ /४ मधील क्लब सहभागी झाले होते.

-----------