मधुकर गोलांडे यांचे निधन
पिंपरी, ता. २८ : चिंचवड येथील मधुकर गणपत गोलांडे (वय ८०) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि सात मुली, नातवंडे असा परिवार आहे. चिंचवड येथील आगा इंडस्ट्रीजमध्ये त्यांनी सलग ३५ वर्षे वाहनचालक म्हणून विनाअपघात सेवा केली . शहरात प्रथमच ढोल - ताशा सुरु करणारे आणि हॉटेल व्यावसायिक गणेश गोलांडे यांचे ते वडील होत. गणेश यांनी अनेक ढोल-ताशा पथकामध्ये काम केले आहे. तसेच अनेक नवोदित ढोल पथकातील तरुणांना मार्गदर्शन केले. गरवारे वॉलरोप्सचे माजी सरव्यवस्थापक सुरेश गोलांडे यांचे ते बंधू आणि माजी नगरसेवक राजू गोलांडे यांचे ते काका होत.
-----
