25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

मराठी पत्रकार संघाच्या शहराध्यक्षपदी नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी, ता. २ : मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी दै. 'केसरी' चे नंदकुमार सातुर्डेकर यांची तर सरचिटणीसपदी 'पीसीबी टुडे'चे अविनाश चिलेकर यांची निवड झाली आहे.   


 मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पिंपरीत झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संघाच्या उपाध्यक्षपदी मिलिंद कांबळे (दै.पुढारी) खजिनदारपदी विवेक इनामदार (माय पुणे सिटी न्यूज )यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्यांमध्ये गणेश यादव (दै.लोकसत्ता ), पंकज खोले (दै.पुढारी), मिलिंद वैद्य यांचा समावेश आहे.

-------------