26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना तिसरा व अंतिम लकी ड्रॉ १० जूनला

मुंबई, ता. ९ : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा तिसरा व अंतिम लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने ता. १० रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता ६५१ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी १३०२ विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. दि. ७ एप्रिल व दि. ७ मे रोजीच्या पहिल्या व दुसऱ्या लकी ड्रॉ मधील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे.


महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. दि.१ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले ऑनलाईन पध्दतीने भरणाऱ्या सर्व लघुदाब वीज ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.


ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन पध्दतीने भरणा केलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in  या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.


ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे.


या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील.

---------------