30.22°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर.

कोल्हापूर, ता. २५ : द महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची (MASMA) वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात झाली. या सभेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले १०० हून अधिक उद्योजक उपस्थित होते. 


तत्कालीन अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी मागील वर्षाच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा आढावा सभेसमोर मांडला. कोषाध्यक्ष समीर गांधी यांनी मागील वर्षाचा आर्थिक अहवाल सादर केला, जो सर्व सदस्यांनी एकमताने संमतीने स्वीकारला. अध्यक्ष शशिकांत वाकडे यांनी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. नवीन कार्यकारिणीनुसार यंदा नाशिकचे अमित कुलकर्णी यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कोल्हापूरचे प्रदीप खाडे उपाध्यक्ष, पुण्याचे सहज मुथा सचिव तर कोषाध्यक्ष म्हणून चिन्मय कुलकर्णी यांची नियुक्ती झाली.


कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, परभणी, अहिल्यनगर, नागपूर इत्यादी भागांतील सदस्यांनी या सभेमध्ये उपस्थित राहून सहभाग नोंदवला. ही वार्षिक सभा अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडली, जिथे सर्व सदस्यांनी सहभाग घेत आपला आनंद व्यक्त केला.


मास्माचे संचालक मंडळ समीर गांधी, भर्तेश धूली, राजेंद्र पांचाल, नितीन कुलकर्णी, अक्षय पांचाल, स्वप्नील बाठे, मनीषा बारबिंद, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, राजेश मुथा व रोहन उपसनी इत्यादींचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. नविन अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी मास्माच्या भविष्यातील विकासदृष्टीकोणावर भाष्य केले व विविध नवकल्पनांची मांडणी केली. ज्यात या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या महिला उद्योजकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर पांडे व अतुल होनोलें यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. या यशस्वी आयोजनामध्ये अतुल होनोलें, नितीन कुलकर्णी, प्रदीप खाडे, धनाजी एकल, अभिजीत विचारे व कोल्हापूर टीममधील सर्व सदस्यांनी मोलाचे योगदान दिले.


 --------------