25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात

पिंपरी, ता. २० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयात अभिवादनप्रसंगी उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी मनोज माछरे, अनिल लखन उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, संत तुकारामनगर येथील कार्यक्रमास अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे,अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. अभयचंद्र दादेवार, तसेच डाॅ. मनिषा सूर्यवंशी, आरोग्य निरीक्षक राजकुमार वाघमारे, सिस्टर इनचार्ज सविता निगडे आदी उपस्थित होते.


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महर्षि वाल्मिकी विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी मोकळ्या मैदानात करण्यात आले होते.

या प्रबोधन पर्वास उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विधीतज्ञ सागर चरण, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रबोधन पर्वाच्या प्रारंभी महापालिकेच्या आरोग्य आणि वैद्यकीय विभागातील उत्कृष्ट कामकाज करणा-या सफाई कामगार, वॉर्डबॉय, आया,आरोग्य निरीक्षक यांना प्रशस्तीपत्रक, शाल देऊन गौरविण्यात आले.

सफाई कर्मचारी यांचेकरीता बहारदार हिंदी, मराठी गीतांसह महिला सफाई कर्मचाऱ्यांसाठी विशेष होम मिनिस्टर- खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला सफाई कर्मचाऱ्यांनी सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दर्शवला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितांचे आभार किरण गायकवाड यांनी मानले.

------