महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन....
पिंपरी, ता. २९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी (ता. २९) पिंपरी येथील महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उप आयुक्त राजेश आगळे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपलेखापाल अंकुश कदम, सुभाष देवकाते,अनिल कु-हाडे,कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार,सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्रीराम परदेशी, शिवप्रसाद बायस तसेच विविध विभागातील कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
निगडी येथील महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्यास उप आयुक्त सिताराम बहुरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी माजी नगरसदस्य उत्तम केंदळे, माजी नगरसदस्या सुमन पवळे,कमल घोलप, क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोळप, कार्यकारी अभियंता रविंद्र वायकर, निगडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कनिष्ठ अभियंता अभिजित गणबोटे, अभय कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते शिवकुमार सिंह बायस,डॉ. श्रीराम परदेशी,नारायण सिंह सोनार, अतुल परदेशी, विशाल परदेशी,आशुतोष चंदेल,ललित राजपूत, कुणाल राजपूत,आतिषसिंह राजपूत, अश्विनी राजपूत, अशोकसिंह परदेशी, कैलाससिंह चौहान, राणा अशोक इंगळे,सागरसिंह बघेल,प्रवीणसिंह राजपूत, रवींद्रसिंह कच्छवे, गणेशसिंह राजपूत, विठ्ठलसिंह राजपूत आदी उपस्थित होते.
--------------