26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

महानगरपालिकेच्या मोशी दवाखान्यात भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, ता. ७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोशी रुग्णालय व जीवनशेठ तापकीर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण २३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला असून ६९ युनिट रक्त संकलित करण्यात आले.


या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार महेश लांडगे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते करण्यात आले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रक्त पेढी मध्ये गरजू रुग्णांसाठी रक्त संकलित केले जाते. यासाठी महापालिका व जीवनशेठ तापकीर मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जमा झालेले हे रक्त समाजातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 


या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात भोसरी रुग्णालय प्रमुख डॉ. शिवाजी ढगे, मोशी दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रामनाथ बच्छाव, वायसीएम रुग्णालय रक्त पेढीचे डॉ. गणेश लांडे आणि समाजसेवा अधिक्षक किशन गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उदय तापकीर आदींचे सहकार्य लाभले. 


कोट - 

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व दात्यांचे व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मनःपूर्वक आभार. 

 डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

-----------