लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आदर्शरित्या नियोजन करणार – अतिरिक्त आयुक्त सांडभोर
पिंपरी, ता. १५ : '' साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजित करताना विविध संस्था, संघटना, नागरिक यांच्याकडून आलेल्या सूचनांचा विचार करण्यात येईल. हा कार्यक्रम उत्साहात व आदर्शरित्या साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयत्नशील आहे,'' असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यावर आधारित १ऑगस्ट ते ५ ऑगस्ट या कालावधीत पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथे करण्यात येते. यंदाही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाशी संबंधित महापालिका अधिकारी, पोलीस, मेट्रो प्रशासन, पी.एम.पी.एम.एल. अधिकारी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समिती पदाधिकारी तसेच शहरातील विविध सामाजिक संघटना प्रतिनिधीं यांचे समवेत आढावा बैठक काल आयोजित करण्यात आलेली होती,या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
बैठकीस माजी नगरसदस्य भगवान शिंदे, काळूराम पवार, माजी नगरसदस्या कमल घोलप, उपायुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, कार्यकारी अभियंता विजय वायकर, डी.पी.पवार, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ, जेजुरी देवस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे, मेट्रो व्यवस्थापनाचे धनंजय कृष्णन,युवराज गावंडे, उप-अभियंता ए.ए.कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे,संदीपान झोंबाडे, नितीन घोलप,संजय ससाणे,युवराज दाखले, अरुण जोगदंड, सुनिल भिसे, नाना कसबे, डी.पी.खंडाळे,सतिश भवाळ, सुनिल भिसे, आशा शहाणे, लहुजी वस्ताद साळवे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाबू पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते भाई विशाल जाधव,चंद्रकांत लोंढे, संजय धुतडमल, उत्तम कांबळे, युवराज तिकटे, बाबासाहेब पाटोळे आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये विविध सूचना आल्या आहेत. कार्यक्रमाचे नियोजन करताना या सूचनांचा विचार महापालिका स्तरावर करण्यात येईल. सर्वांच्या सहकार्याने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्व उत्साहात साजरा करण्याचे नियोजन असून त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे मत उप आयुक्त अण्णा बोदडे यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दरवर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येते, याबद्दल विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करून शहराला सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख करून देण्यासाठी असे महोत्सव उपयोगी ठरतात असे सांगितले.
बैठकीमध्ये प्राप्त सूचना....
विचार प्रबोधन पर्वानिमित्त उत्तम वक्त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करावे, उत्कृष्ट व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करावे, शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी निबंध,चित्रकला यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करावे, शहराच्या स्वच्छतेविषयी प्रभावी भूमिका बजावणाऱ्या स्वच्छतादूत म्हणजेच अवकारीका सिनेमा कलाकारांचा सन्मान करण्यात यावा,रोजगार मेळाव्याचे आयोजन करावे,वृक्षारोपण मोहिम,आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन, परिसंवाद,महिलासांठी कार्यक्रमाचे आयोजन करावे तसेच कार्यक्रमास मान्यवरांना निमंत्रित करावे यासह विविध सूचना यावेळी मांडण्यात आल्या.
बैठकीचे प्रास्ताविक उपायुक्त अण्णा बोदडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.
------------