25.22°C Pune
Tuesday, December 16
Breaking News:
image

लाड-पागे समिती व अनुंकपा धोरणानुसार ४० वारसांना महानगरपालिकेत मिळाली नोकरी...

पिंपरी, ता. ९ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लाड-पागे वारस नियुक्ती आणि अनुकंपा वारस नियुक्तीनुसार ४० जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी बुधवारी (ता. ९) दिली.


महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत,महानगरपालिकामधील सफाई आणि ड वर्गातील कर्मचाऱ्यांना लाड पागे समितीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखाद्या सफाई किंवा ' ड ' वर्गातील कर्मचाऱ्यांने स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास, वैद्यकीय अपात्रता किंवा एखादा कर्मचारी सेवेत असताना मयत झाल्यास त्याच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.


त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर १, लिपिक ७, शिपाई ९ , मजूर ४ , गटरकुली १ आणि सफाई कामगार म्हणून १८ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे. तसेच अनुकंपा धोरणानुसार लिपिक पदावर ५ जणांना, शिपाई पदावर ५ जणांना व सफाई कामगार म्हणून ४ जणांना नियुक्ती देण्यात आली आहे, असे सह आयुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.

----------------