30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

जनसंवाद सभेत ७२ तक्रारवजा सूचना

पिंपरी, ता. ३० : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नुकत्याच झालेल्या जनसंवाद सभेत एकूण ७२ तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यात सुसंवाद राखण्यासाठी महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांत महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. त्यानुषंगाने जुलैच्या दुसऱ्या सोमवारी अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभा पार पडली. यावेळी नेमून दिलेल्या समन्वय अधिकाऱ्यांनी जनसंवाद सभेचे अध्यक्षपद भूषविले.


     आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयात अनुक्रमे ७, ९ , ८, १४, ९, ४, ६,आणि १५ अशा एकूण ७२ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.यावेळी नागरिकांनी शहरातील वाहतुकीला होणारा अडथळा, शहरात ठिकठिकाणी पडणारा कचरा, पावसामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सेवा उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधाची पूर्तता, महापालिका दवाखान्यात नागरिकांना मिळणाऱ्या सेवा सुविधा, रस्त्यांवर वाढलेल्या भिकाऱ्यांची संख्या आदी तक्रार वजा सूचना जनसंवाद सभेत नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.

------------------