26.34°C Pune
Friday, January 30
Breaking News:
image

हार्दिक जोशी आणि चेतन चावडा सोबत ‘अरण्य’ची अधिकृत घोषणा..

पिंपरी, ता. २५ : लेखक-दिग्दर्शक अमोल करंबे यांनी आपल्या आगामी मराठी चित्रपट ‘अरण्य’ ची अधिकृत घोषणा त्यांच्या इंस्टाग्रामच्या पोस्टिंग नी नुकतीच केली. या चित्रपटात मुख्य भूमिकांमध्ये लोकप्रिय अभिनेते हार्दिक जोशी आणि चेतन चावडा झळकणार आहेत. प्रेक्षकांच्या उत्कंठेला आणखी उधाण देत, त्यांनी आपल्या सोशल मीडियावर “प्रेसेंटिंग मेरे दो अनमोल रतन-माय हीरो एंड विलन – अरण्य” असा फोटो कॅप्शनसह एक विशेष फोटो पोस्ट केला आहे.


पुण्यात सुरू असलेल्या खासदार प्रीमियर लीगच्या नेते विरुद्ध अभिनेते या स्पर्धात्मक क्रिकेट सामन्याच्या दरम्यानची असून, याच निमित्ताने हार्दिक जोशी आणि चेतन चावडासोबतचा फोटो अमोल करंबे यांनी शेअर केला आहे. चित्रपटाचे निर्माते शरद पाटील असून, ‘अरण्य’ हा एक वेगळा अनुभव देणारा, सामाजिक वास्तवाशी जोडलेला आणि भावनिक गुंतवणूक असलेला सिनेमा असणार आहे.


हार्दिक जोशी, जे ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचले आहेत, तर चेतन चावडा एका तगड्या खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सोशल मीडिया वरील काही पोस्ट वरून कळतय की, सुरेश विश्वाकर्मा, विजय निकम, ह्रितिका पाटील यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

‘अरण्य’ हा चित्रपट फक्त एक कथा न राहता, सामाजिक संदेश, पर्यावरण, नातेसंबंध आणि संघर्ष यांचं एक प्रभावी चित्रण प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.


संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर आता ‘अरण्या’ बाबत उत्सुकता वाढताना दिसत आहे. अमोल करंबे यांच्या लेखणी व दिग्दर्शनातून हे अरण्य काय सांगणार, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

---------------