30.78°C Pune
Saturday, October 18
Breaking News:
image

डी. वाय. पाटील महाविद्यालयात मॉडेल मेकिंग स्पर्धा


पिंपरी, ता. २५ : आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कला- वाणिज्य,- विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात "वाणिज्य क्षेत्र मॉडेल मेकिंग स्पर्धा  डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थ्यांची " वाणिज्य क्षेत्र मॉडेल मेकिंग स्पर्धा, ऐक्यम क्राया (युनिटी इन ट्रेड)" आयोजित करण्यात आली. स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला.


स्पर्धेचे उद्घाटन श्रावणी पाकळे, पी. जी. डी. एम. महाविद्यालयातील सहाय्यक कार्यकारी, डॉ. डी. वाय. पाटील कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ हावगी बिरादार, उपप्राचार्य प्रदीप कांबळे, यांच्या हस्ते झाले. किर्ती कुकळेकर आणि अमृता दीक्षित (हिंगणे) यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. श्रावणी पाकळे आणि डॉ. सारा डिसुझा यांनी मॉडेल्सचे परीक्षण केले व सादरीकरण, प्रकल्पाचे स्वरूप, प्रश्नोत्तरे या आधारावर त्यांना गुण देण्यात आले.

बँकिंग आणि पैशाची उत्क्रांती, अर्थव्यवस्था, ऊर्जा क्षेत्र, पुरवठा साखळी व्यवस्थापन, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, रिझर्व बँक ऑफ इंडिया, नाबार्ड इत्यादी विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणारी विविध मॉडेल्स तयार करण्यात आली होती.

विद्यार्थी आणि पालकांचा सहभाग असलेला, विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने केलेला हा आतापर्यंतचा सर्वोत्तम कार्यक्रम होता. संस्था विश्वस्त तेजस पाटील आणि कॅम्पस डायरेक्टर रियर ऍडमिरल अमित विक्रम (निवृत्त), मुख्य वित्त अधिकारी बी. एच. शर्मा यांचा पाठिंब्यामुळे कार्यक्रम यशस्वी रित्या झाला.

----------------