चिंचवडला जागतिक पर्यटन उत्साहात
चिंचवड, ता. ११ : येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ.अरविंद ब.तेलंग इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे " जागतिक पर्यटन दिन " साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून टुरिझम व्यवसायिक निशिता घाटगे, सीईएस डॉ.अ.ब तेलंग आयएचएम, पुणे येथील प्राचार्य डॉ. अजयकुमार एम. राय आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिप्रज्वलनाने झाली. प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी उपस्थित अतिथींचे स्वागतपर भाषण केले. त्यामध्ये त्यांनी यावर्षी जागतिक पर्यटन दिनाचा विषय “टुरिसम अँड पीस” या विषयी विस्तृत माहिती सांगितली. दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जातो. यावर्षी "पर्यटन आणि शांतता" हि संकल्पना असल्याने त्याविषयीचे महत्व सांगितले.
यावर्षी देखील "जागतिक पर्यटन दिनानिमित्त” विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट पर्यटन स्थळाची माहिती देणारे पोस्टर आणि उत्तम रील या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी निशिता घाटगे यांनी विद्यार्थ्यांना स्वतःचा विकास कसा करावा, याबद्दल मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्याना काही मोलाचे सल्ले दिले जसे कि स्वतःचा एक ब्रँड तयार करा. त्यासाठी कितीही मेहनत करावी लागली तरी त्याची तयारी ठेवा. रोज नवनवीन गोष्टी शिका आणि त्या अमलात आणा. मनाशी ठरवले तर जे ध्येय ठरवले आहे ते पूर्ण होतेच होते फक्त त्याला प्रयत्नांची जोड हवी. रोज स्वतःसाठी जीवनामध्ये अपडेट् राहण्यासाठी वेळ द्या. जे आहे तसे कॉपी आणि पेस्ट करण्यापेक्षा जे खूप दुर्मिळ परंतु खास आहे अशा गोष्टींचा अभ्यास करा. तसेच पर्यटना विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. सर्वोत्कृष्ट संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत असे सांगून बहुमूल्य मार्गदर्शन केले. पर्यटन उद्योगामध्ये अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत असे सांगून यशाचे मंत्र सांगितले.
कार्यक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिफा सिंग आणि झेरिको ट्रवायसो या विद्यार्थ्यांनी केले. प्राचार्य डॉ. अजयकुमार राय यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती आणि मानद सचिव बी.व्ही.जावळेकर यांचे वेळोवेळी सहकार्य व बहुमूल्य मार्गदर्शन मिळत असल्याचे सांगितले.
शेवटी प्रा. शेखर खैरनार यांनी आभार व्यक्त केले.
------