बारामतीत परशुराम जयंती कार्यक्रम
बारामती, ता. ११ : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, शाखा बारामतीच्या वतीने परशुराम जन्मोत्सवानिमित्त ४ मे रोजी कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात सुश्राव्य अशा रामतांडवने झाली . या कार्यक्रमासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी उपस्थित होते. तसेच पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे आणि महिला आघाडी अध्यक्ष केतकी कुलकर्णी तसेच पुणे जिल्हा ब्रह्मोद्योग आघाडीचे अध्यक्ष अमोघ पाठक , प्रदेश उपाध्यक्ष ( मनसे ) ॲड. सुधीरजी पाटसकर हे ही उपस्थित होते
गोविंदजी कुलकर्णी यांनी संघटनेची दिशा स्पष्ट केली व तरुणांच्या रोजगारावर अधिक लक्ष देण्याची इच्छा व्यक्त केली. माधवी गोडबोले यांनी परशुरामांवर व्याख्यान दिले. तसेच संघटनेत काम करत असणाऱ्या ३६ पदाधिकाऱ्यांना पदाची नियुक्ती पत्रके देण्यात आली. यात दाते गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे पदाधिकारी व नियुक्तीधारकांना परशुराम प्रतिमा भेट देण्यात आली. कार्यक्रमाला बारामतीच्या ब्रह्मावृंदांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला .महिलांची संख्याही लक्षणीय होती.
या कार्यक्रमासाठी बारामती शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये केदार सुभेदार, माधव जोशी, मेधा पळशीकर, जगदीश देशपांडे, राजेंद्र देशपांडे, मिलिंद पिटके, प्रशांत पळशीकर, अमित पाटील,जयश्री दाते, मोहिनी ठोंबरे, सारिका इंगळे, वृषाली गरगटे, विद्या भोयरेकर, स्वाती कुलकर्णी, सुप्रिया सावरकर यांचा समावेश आहे.
---------