ब्ल्यूरिज युनिट बी सोसायटीतर्फे रामलीला उत्सवाचे आयोजन
हिंजेवाडी, ता. १० : येथील ब्ल्यूरिज युनिट बी सोसायटीच्या वतीने सलग तिसऱ्या वर्षी रामलीला सादर करण्यात येत आहे. दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाने याची सांगता होईल.
नवरात्रीदरम्यान रामायणाचा चार-दिवसीय नाट्य उत्सव सध्या बुधवारपासून (ता. ९) सुरु आहे. या उपक्रमाला मिनाक्षी पाठक यांनी प्रेरणा दिली. मैत्रीण राखी कटारियासोबत ही दृष्टी सामायिक करून त्यांनीही अशाच आठवणी जपल्या. यातूनच ४० ते ५० रहिवाशांची टीम तयार करायला सुरुवात केली. बॅकस्टेजमध्ये २० जण सहभागी झाले होते.
विविध व्यावसायिक पार्श्वभूमीतून आलेले २ ते ७० वयोगटातील सहभागी, या सांस्कृतिक वारशाला जिवंत करण्यासाठी कामानंतर अनेक तास समर्पित करतात. एकत्र येऊन, ते संहिता लेखन, ऑडिशन, संगीत, रंगभूमीवरील सामानसुमान, स्टेज डिझाइन, मेकअप, संवाद आणि वेशभूषांमध्ये सहकार्य करतात, भारताच्या समृद्ध परंपरांचा सन्मान आणि जपण्यासाठी एकत्रितपणे बांधिलकी दर्शवतात.
या उत्सवात सहभागी कलाकार :
संहिता : मिनाक्षी पाठक, उर्वशी जैन (रामचरित मानस - तुलसीदास)निर्देशक: राखी कटारिया आणि मिनाक्षी
संपादन: नितिन जैन, हर्ष तिवारी, राखी कटारिया, मिनाक्षी पाठक
रंगभूमीवरील सामानसुमान : अदिती धुपकर, विशाखा खरें, रुपाली अग्रवाल, राखी कटारिया, अक्षिता जैन, सोनल अग्रवाल, रामनीत कौर, वर्णिका
संगीत: राखी कटारिया, मिनाक्षी पाठक, लाइव बासरी - सूर्यकांत रेडेकर
वेशभूषा: मिनाक्षी पाठक, राखी कटारिया, अंकित अग्निहोत्री
मेकअप आर्टिस्ट: अवंती जेजुरीकर, सहाय्यक - प्रिया गुप्ता
-------------
